शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ज्येष्ठ मल्लांना तूर्त चार महिन्यांचेच मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:59 IST

कोल्हापूर : हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांचे मासिक मानधन मार्चपासून प्रलंबित आहे; परंतु सरकार गरीब असल्याने या मल्लांचे एप्रिल ते जुलै या चारच महिन्यांचेच मानधन

ठळक मुद्देअरेरे..गरीब सरकार : आज खात्यावर पैसे जमा; ‘लोकमत’चा पाठपुरावाकोल्हापूर जिल्ह्णांतील १९ मल्लांची ३ लाख ४० हजार रुपये एवढी ही रक्कम आहे.

कोल्हापूर : हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी मल्लांचे मासिक मानधन मार्चपासून प्रलंबित आहे; परंतु सरकार गरीब असल्याने या मल्लांचे एप्रिल ते जुलै या चारच महिन्यांचेच मानधन तूर्त मंजूर केले आहे. या मानधनाचे बिल जिल्हा कोषागार कार्यालयाने गुरुवारी दुपारी मंजूर केले. आज, शुक्रवारी या मल्लांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्णांतील १९ मल्लांची ३ लाख ४० हजार रुपये एवढी ही रक्कम आहे.

या ज्येष्ठ कुस्तीपटूंचे मानधन गेल्या दहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे वृत्त १२ डिसेंबरला दिले होते. याप्रश्नी बुधवारी शिवसेनेने जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी क्रीडा अधिकाºयांनी तांत्रिक कारणाने हे मानधन रखडले, असे सांगितले. याचा शोध ‘लोकमत’ने घेतला असता क्रीडा विभागानेच मानधनाचे बिल आजअखेर कोषागार कार्यालयात जमा केले नसल्याचे स्पष्ट झाले. कोषागार कार्यालयाने सह्यांची खात्री करण्यासाठी बिले थांबवून ठेवल्याने मल्लांना हे मानधन देण्यात विलंब झाल्याचे क्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांनी सांगितले होते; परंतु सोपल यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे कोषागार कार्यालयात चौकशी केल्यावर स्पष्ट झाले.

मल्लांच्या मानधनाचे बिल कोल्हापूर क्रीडा कार्यालयाने गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कोषागार कार्यालयातच जमा केले नव्हते. ‘लोकमत’ने चौकशी केल्यानंतर सूत्रे हलली आणि तातडीने दुपारी तीननंतर कोषागार कार्यालयात बिल जमा केले. कोणतीही त्रुटी नसल्याने हे बिल तातडीने मंजूर केल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांनी सांगितले. बिल जमा न करता कोषागार कार्यालयामुळे बिलास उशीर झाला, अशी खोटी माहिती जबाबदार अधिकारी कशी देतात, याबद्दल तिथे आश्चर्य व्यक्त केले. क्रीडा विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांना मानधनाबाबत शंका आल्याने त्यांनी १९९३ ते २०१७ पर्यंतच्या मल्लांना मानधन देण्याचे जे आदेश झाले ते सर्व तपासले. त्यामुळेही मानधनास विलंब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.अधिकाºयांकडून कर्जमाफीचे कारणया मल्लांचे दहा महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. ही रक्कम चार-दोन लाखांत आहे; परंतु तरीही पुरेसा कॅश फ्लो नाही म्हणून चारच महिन्यांचे मानधन आता मंजूर करण्यात आले आहे. कर्जमाफीमुळे कमी कॅश फ्लो असल्याचे अधिकारी सांगतात परंतु दहा महिन्यांपासून मानधन प्रलंबित आहे तर ते एकदाच देऊन टाकावे, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत.